ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणीला वारंवार तारीख पे तारीख मिळत असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होतील असा प्रश्न सतत विचारला जात आहे. दरम्यान राज्यातील मुदत संपलेल्या महापालिका निवडणुकीबाबत भाजपचे नेते तथा सहकार मंत्री अतुल सावे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. "ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर तीन महिन्यांत याबाबत कोर्टाचा निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर नगर परिषद, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा विषय मार्गी लागू शकेल, असे सावे म्हणाले आहे. 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले आहे.
दरम्यान ऑगस्ट 2022 पासून ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तर सुनावणीला वारंवार तारीख पे तारीख मिळत असल्याने उशीर होत आहे. परिणामी राज्यातील महापालिका निवडणुकांना ब्रेक लागला आहे. तर सुनावणी कधी संपणार, यावर न्यायालयाचा निकाल कधी येणार यावर सर्व पुढील गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका पावसाळ्यानंतरच होईल असा अंदाज बांधला जात होता. तर यावर आता मंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देताना, पुढील तीन महिन्यात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर निकाल येण्याची अपेक्षा वर्तवली आहे. तसेच न्यायालयाचा निकाल आल्यास त्यानंतर नगर परिषद, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा विषय मार्गी लागू शकेल, असेही सावे म्हणाले आहे.
ओबीस आरक्षणासह मविआ सरकारच्या काळातील वार्डरचनेला देखील सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तर मविआ सरकारच्या काळातील वार्डरचना न्यायालयाने कायम ठेवली तर निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ज्यात 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती असा सगळ्या निवडणुका मार्गी लागू शकतात. तसेच सावे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार निकाल तीन महिन्यात आलाच तर पावसाळ्यानंतर निवडणुका होऊ शकतात. पण आता न्यायालयाचा निकाल कधी येतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.



1 एप्रिलपासून केवळ कॅलेंडरचे पान पलटणार नाही, तर तुमच्या आयुष्यातही मोठा बदल होणार आहे. नवीन आर्थिक वर्षाची, 2023-24 सुरुवात शनिवारपासून होत आहे.    
नवीन कर व्यवस्था लागू :
नवीन कर व्यवस्था 1 एप्रिलपासून लागू होईल. नवीन कर व्यवस्थेत केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये 7 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. करदात्यांनी जुनी कर व्यवस्था निवडली तर त्यांना या सवलतीवर पाणी सोडावे लागेल. 1 एप्रिलपासून हा नियम लागू होईल.


इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल
नवीन कर व्यवस्थातंर्गत कर रचनेत 0 ते 3 लाख रुपयांवर शून्य, 3 ते 6 लाखांवर 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 ते12 लाखांवर 15 टक्के आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के सवलत मिळेल. एलटीए मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी नसणाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंट 2002 नुसार, 3 लाख रुपये होती. त्यात आता भरघोस वाढ करुन 25 लाख करण्यात आली आहे.


महिला सम्मान योजनेची सुरुवात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी एक खास बचत योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, महिला सम्मान योजनेची सुरुवात करण्यात आली. महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत बचतीवर 7.5 टक्के व्याज मिळेल. महिला 2 वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करु शकतील. त्यांना त्यावर 32 हजार रुपयांचा फायदा होईल.


प्रधानमंत्री वय वंदना योजना होणार बंद
उतारवयातील आर्थिक तरतूद म्हणून एक प्रमुख योजना प्रधानमंत्री वय वंदन योजना 1 एप्रिलपासून बंद होत आहे. एनपीएसमधील इतर योजनांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही प्रमुख योजना बंद करण्यात येत आहे. या योजनेत एकरक्कमी रक्कम जमा केल्यानंतर पेन्शनचा लाभ मिळेल.


कमी टीडीएस होईल कपात
तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील आणि तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर आता कमी कर द्यावा लागेल. 1 एप्रिलपासून पीएफ खात्याशी पॅन कार्ड लिंक नसेल तर 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस द्यावा लागेल.


ज्येष्ठ नागरिक बचत योजना
आता ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये पहिल्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येईल. आता या गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी जास्तीतजास्त 15 लाख रुपये गुंतवणूक करता येत होती. या योजनेत वार्षिक 8 टक्के व्याज देण्यात येते.





केंद्र सरकार कडून आज एप्रिलच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 92 रुपयांची कपात करण्यात आली असून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणते ही बदल केलेले  नाही. सरकारने मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात सुमारे तीनशे पन्नास रुपयांची वाढ केली होती. आता किमतीत ९२
रुपये कमी केले आहे. दिल्लीत व्यावसायिक LPG गॅस ची किंमत 2018 रुपये आहे तर कोलकातामध्ये LPG गॅस 2132 रुपयांमध्ये विकला जात आहे. चैन्नईत 2192.50 रुपये आहे तर मुंबईत LPG गॅस साठी 1980 रुपये मोजावे लागत आहे. मात्र घरगुती गॅसच्या किमतीत काहीही बदल झाला नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना निराशा झाली आहे.



नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एका रात्रीत लोकप्रिय झाले. महाराष्ट्रात ते दोघे आर्ची-परशा या नावाने ओळखले जातात. सैराटमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळत असते. नुकतेच आकाश ठोसरने लोकमतच्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने रिंकू सोबतच्या अफेयरच्या चर्चेवर मौन सोडले.
आकाश ठोसर लवकरच घर बंदुक बिर्याणी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सायली पाटील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकमतच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी आकाश ठोसरला रिंकू सोबत अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळतात. तर हे खरं आहे का, असे विचारल्यानंतर आकाश म्हणाला की, असं काही नाही...आम्ही खूप चांगले मित्र आहेत. मित्र भेटतो आणि फिरत असतो. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आकाश रिंकू पेक्षा आर्ची परशा म्हणून लोकांना आम्ही जास्त आवडतो. आमच्यात तसे काही.
त्यानंतर आकाशला विचारले की, तू कोणाला डेट करतो आहेस का? त्यावर तो म्हणाला की, आकाश सध्या स्वतःलाच डेट करतो आहे.
आकाश आणि रिंकू हे खूप चांगले मित्र आहेत. एकमेकांना भेटल्यावर हे दोघेही आपल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या दोघांनी आता लग्न करायला हरकत नाही किंवा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेर अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर आकाश आणि रिंकूला याची फार गंमत वाटते.

अलीकडील काही दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं एका 13 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बी श्रावणाथी असे या मृत्युमुखी मुलीचे नाव असून सदर घटना महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा मंडळातील अब्बापलेम गावातील आहे.बी श्रावणाथी इयत्ता सहावीत शिकत असून आपल्या आईवडील आणि दहावीत शिकणाऱ्या भावासोबत राहत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी श्रावणाथी आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती. शुक्रवारी अचानक सकाळी तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तिने आपल्या आजीला त्रास होत असल्याचे सांगितले तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिला सीपीआर देण्यात आला मात्र तिला वाचवता आले नाही.वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिची प्राण ज्योत मालवली.

कोलकाता

सामान्य