29/12/2021 14:32:42 PM Sweta Mitra 142
भाजपचा एक बडा नेता वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. तुम्हाला ५० रुपयांमध्ये दारू देऊ, असं वक्तव्य भाजप नेत्याने केलं आहे. आंध्र प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू विराजू यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपला तुम्ही एक कोटी मतं द्या. तुम्हाला फक्त ७० रुपयांमध्ये दारू देऊ, असं ते विराजू म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर सत्तेत आल्यावर सरकारकडे महसूल अधिक उरल्यास तुम्हाला फक्त ५० रुपयांमध्ये दारू उपलब्ध करून देऊ, असं विराजू म्हणाले. आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू विराजू यांची विजयवाडामध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळी विराजू यांनी हे वक्तव्य केलं.