09/02/2022 14:01:55 PM Sweta Mitra 207
केंद्रीय बँकांच्या संभाव्य व्याज दर वाढीच्या पार्श्वभूमीवर सोने दरातील तेजी कायम आहे. आज बुधवारी कमोडिटी बाजारात सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला. सलग तिसऱ्या दिवशी सोने महागले असून सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 48,535 रुपयांवर गेला. सोन्याच्या दरातील वाढ अशीच कायम राहिली असता लवकरच तो एकूण 49 रुपयांच्या स्तर गाठेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तीन दिवसात सोने 650 रुपयांनी महागले आहे. तर चांदीचा दर आज तेजीने व्यवहार करत आहे चांदीचे भाव आज हिरो पूर्णांक 29 टक्क्यांच्या वाढीचा व्यापार करत आहेत एक किलो चांदीचा दर 65 हजार 549 रुपये झाला आहे.