29/12/2021 14:34:55 PM Sweta Mitra 144
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. तर वैजापूर तालुक्यात गाढे पिंपळगावात परिसरात गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार, गोळेगाव, शिवना येथे रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर वैजापूरच्या चेंडूफळ येथे गाऱ्यांचा पाऊस पडला. या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.