29/12/2021 14:40:25 PM Sweta Mitra 66
राज्यात ओमिक्रोन संसर्गाचा प्रादुर्भाव धीम्या गतीने वाढतो आहे. राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ओमिक्रोन बाबत दिलेल्या अहवालानुसार आज 11 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी नऊ मुंबईतील आणि उर्वरित तीन पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि उस्मानाबादेतील आहेत. मुंबईत आढळलेल्या ओमिक्रोन बाधित रुग्णांपैकी 18 वर्षाखालील एक मुलगा आणि एक मुलीचा यात समावेश आहे. उस्मानाबाद येथील निकटवर्तीयांच्या मुलीला लागण झाली असून नवी मुंबईतील मुलाने आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. दोन्ही मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या राज्यात रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे.