29/12/2021 14:46:31 PM Sweta Mitra 152
अमरावती जिल्ह्यात मानवी मनाला हादरवून साेडणारी घटना समोर आली आहे. महर्षी तालुका अंतर्गत येणाऱ्या मुर्शी गावात सकाळच्या सुमारास कचऱ्याच्या उकिरड्यात स्त्री जातीचे अर्भक मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच पोलीसांनी स्त्री जातीचे मृत अर्भक ताब्यात घेऊन या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.