29/12/2021 14:22:34 PM Sweta Mitra 134
महाराष्ट्रात कोरोना बाधित आणि ओमिक्राेन बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निर्बंध लावण्यात आले आहेत. दिल्लीत मॉल्स, रेस्टारंवर निर्बंध लावण्यात आले आहे. महाराष्ट्रात निर्बंध लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फाेर्स आणि आरोग्य विभागाची एकत्रितपणे बैठक होणार आहे.