01/03/2022 13:54:37 PM Sweta Mitra 135
'कच्चा बादाम' हे गाणे गात संपूर्ण जगाला वेड लावलेला गायक भुबन बड्याकार यांचा अपघात झाला आहे. त्यांचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला. या अपघातात ते जबर जखमी झाला असून अपघातानंतर भुबनला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुबनच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुबन बड्याकरचा अपघात सोमवारी झाला आहे. भुबनने नुकतीच एक कार खरेदी केली. भुबन आता कार चालवायला शिकत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर गायकाला सुपर स्पेशियलिटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.