कोरोनाच्या भीतीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
10/01/2022 17:44:38 PM Poulami Das 179
तामिळनाडूच्या कलमेडू जवळील एमजीआर कॉलनीत एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यात 23 वर्षीय महिला आणि तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या कुटंबातील मुलगी ज्योतिका कोरोना बाधित आली. ही माहिती ज्योतिकाने तिच्या आईला दिली. त्यामुळे ती घाबरली. त्यानंतर कोरोनाच्या दहशतीने कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विष पिऊन कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.