16/03/2022 14:08:51 PM Sweta Mitra 34
भारताची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरने आयसीसी महिला विश्वचषकादरम्यान महिला वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू ठरली. तिने भारताची माजी स्टार फलंदाज अंजुम चोप्राचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरने तिच्या 115व्या एकदिवसीय सामन्यात 127 सामन्यांमध्ये अंजुम चोप्राचा 2856 धावांचा आकडा मागे टाकला आहे. 33 वर्षीय खेळाडूने मागील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावले आणि महिला विश्वचषक स्पर्धेत तीन शतके झळकावणारी ती पहिली भारतीय ठरली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतला अवघ्या 26 चेंडूत केवळ 14 धावा करता आल्या. तिच्या नावी आता 115 वनडेत 2863 धावा झाल्या आहेत.