20/03/2022 16:41:11 PM Sweta Mitra 29
केरळमधील मलप्पुरम येथील पुंगोड येथे फुटबॉल सामन्यादरम्यान उभारण्यात आलेली गॅलरी कोसळली. या दुर्घटनेत जवळपास 200 लोक जखमी झाले असून पाच गंभीर जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी सामना सुरू होण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हा सर्व अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गॅलरी पूर्ण भरलेली दिसत आहे. सामन्यादरम्यान अचानक ही गॅलरी कोसळली. रात्री नऊच्या दरम्यानची केरळमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हा अपघात झाला. मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूरजवळ हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा गॅलरीत 2 हजारांहून अधिक लोक सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.