क्षयरोगांवरील उपचार


24/03/2022 16:50:20 PM   Sweta Mitra         22


औषधांनाही दाद न देणाऱ्या क्षयरोगांवरील उपचारासाठी एमबीपाल (M-BPal Trial) या पद्धतीने उपचार केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालयातील एका रुग्णास सदर मिश्र औषध पद्धतीनुसार उपचार करण्यास १२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून ही औषधी घेणारा हा पहिला रुग्ण ठरला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हीच औषधोपचार पद्धती आता मुंबईतही सुरु करण्यात आली आहे. एमबीपाल (M-BPal Trial) या नावाने सदर औषधोपचार पुरविले जाणार आहेत.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              tb treatment health physical healthy life