देशात काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. त्यामुळे सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना ही कोरोनाची बाधा होते आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठी फेम तृप्ती देसाई यांना कोरोना झाला आहे. फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्या विविध पोस्ट करून त्यांच्याबाबतची माहिती देत असतात. आज त्यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाने मला गाठलंच. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असं तृप्ती देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.