10/04/2022 15:31:45 PM Sweta Mitra 12
आज आयपीएलच्या मैदानात रंगणारा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे केकेआरचा संघ यंदा पॉईंट्स टेबलमध्ये 4 पैकी 3 सामने जिंकत पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्लीने तीन पैकी एकच सामना जिंकला असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार आहेत. आज 10 एप्रिल रोजी होणारा हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.