10/01/2022 17:50:28 PM Poulami Das 81
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधून रविवारी ब्रॉन्क्समधील एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. तर 63 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. न्यूयॉर्कमधील आतापर्यंतच्या सर्वात भीषण आगीच्या घटनांपैकी ही घटना असल्य़ाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान जखमी नागरिकांना शहारातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय.