अभिनेत्री विद्या बालनने भुलभलैया या चित्रपटात मंजुलिकाचे पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. मंजुलिकाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता पुन्हा एकदा त्याच व्यक्तिरेखेसह विद्या बालन मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.भूल भुलैया 2' येत्या 25 मार्च 2022 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भूल भुलैया 2 चा टीजर प्रदर्शित झाला आहे. भूल भुलैया 2' या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यन दिसणार आहे. यात कार्तिकसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू देखील दिसणार आहेत.