29/04/2022 13:52:34 PM Sweta Mitra 4
बॉलिवूड अभिनेताइरफान खान याची आज दुसरी पुण्यतिथी आहे. दोन वर्षांपूर्वी या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला होता. इरफानने हिंदीसोबतच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्येही उत्तम काम केले होते. 'ज्युरासिक पार्क', 'अंग्रेजी मीडियम', 'हिंदी मीडियम', 'लाइफ ऑफ पाय' सारखे संस्मरणीय चित्रपट देणाऱ्या इरफान खानने 29 एप्रिल 2020 रोजी न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरशी संघर्ष करता करता या जगाचा निरोप घेतला. आज भलेही अभिनेता इरफान खान आपल्यात नसेल, पण त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये जिवंत राहील. ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या इरफान खान याचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा शेवटचा चित्रपट ठरला. आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.