बाहुबली चित्रपटातील कटप्पाची भूमिका केलेल्या प्रसिद्ध अभिनेता सत्यराज यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यात काराेनाची गंभीर लक्षणे आढळल्याने त्यांना 7 जानेवारीला संध्याकाळी तात्काळ चेन्नई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सत्यराज आधी होमआयसाेलेशनमध्ये हाेते .मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.