30/04/2022 14:52:42 PM Sweta Mitra 16
रोहित शर्मा आज क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित नाव आहे. तो सध्या टीम इंडियाच्या सर्व फॉर्मेटचा कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणून 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. आता भारतीय क्रिकेट टीमला त्याच्याकडून आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंच्युरी झळकावणाऱ्या रोहितचा आज वाढदिवस आहे. जगातील टॉप क्रिकेटर होण्याचा प्रवास रोहितसाठी सहज घडलेला नाही.त्यानं अत्यंत गरिबीत कष्ट घेत हे शिखर गाठलंय. 'हिटमॅन' च्या आयुष्याची गोष्ट सर्वांना प्रेरणा देणारी आहे.