01/05/2022 16:02:44 PM Sweta Mitra 4
मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे पहाटे १ मे २०२२ रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. वयाच्या ६१ व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले. त्या मुळच्या पुण्याच्या होत्या. त्यांनी विविध चित्रपट, मालिका, कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व दोन हजार पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले. प्रेमा किरण यांनी 80 आणि 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दे दणदण, धूमधडका आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.