हार्दिक आणि अक्षया नवं चाप्टर सुरु


04/05/2022 16:15:16 PM   Sweta Mitra         5


'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळ चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी संसार थाटण्यासाठी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केलीय. हार्दिक-अक्षया यांनी टीव्ही मालिकांमध्ये अप्रतिम अभिनय सादर करत मनोरंजनविश्वात ठसा उमटवलाय. अक्षया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहून तिचे स्टायलिश फोटो शेअर करत असते. हार्दिक ही त्याच्या चाहत्यांवर प्रचंड प्रेम करतो. अशातच आता या जोडीनं त्यांच्या चाहत्यांना खूषखबर दिली आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी साखरपुडा केला असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. साखरपुड्याचे फोटो इंन्स्टाग्रामवर शेयर करुन चाहत्यांना त्यांनी एकप्रकारे सुखद धक्काच दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके राणा दा आणि अंजली बाईंचा साकरपुढा पार पडल्याने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतली लाडकी जोडी आता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे समजते.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              actor actress marathi tujhyat jiv rangla serial