KGF 2 फेम मोहन जुनेजा यांचं निधन


07/05/2022 16:10:11 PM   Sweta Mitra         3


अभिनेता आणि कॉमेडियन मोहन जुनेजा यांचे ७ मे २०२२ रोजी सकाळी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराशी झुंज देत होते. बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. आपल्या विनोदाने लोकांना खळखळवून हसवणाऱ्या मोहन यांच्या जाण्याने आज त्यांच्या चाहत्यांचे डोळे पाणावले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोहन जुनेजा यांनीएक विनोदी कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. केजीएफमध्ये त्यांनी पत्रकार आनंदच्या खबरीची भूमिका केली होती. त्यांनी यापूर्वी अनेक तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्ये काम केलं आहे. आपल्या करिअरमध्ये मोहन यांनी १०० हून अधिक सिनेमे दिले आहेत.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              mohan juneja dead actor kollywood actor kgf 2 fame