मुंबई पुन्हा हरली


10/05/2022 16:28:01 PM   Sweta Mitra         16कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईचा 52 धावांनी पराभव करत आपला पाचवा सामना जिंकला. केकेआरचे 165 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचा संघ 113 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. केकेआरकडून पॅट कमिन्सने 3 तर आंद्रे रसेलने 2 विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीवीर इशान किशनने झुंजार खेळी करत 51 धावा केल्या. मात्र मुंबईच्या इतर फलंदाजांना विकेटवर तग धरता आला नाही.मुंबई इंडियन्सचे पोलार्ड, कार्तिकेय आणि जसप्रीत बुमराह पाठोपाठ धावबाद झाले. त्यामुळे केकेआरने मुंबईचा डाव 113 धावात संपवत 52 धावांनी दणदणीत विजय मिळवला.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              IPL IPL 2022 MUMBAI INDIANS KOLKATA KNIGHT RIDERS SHREYAS IYER ROHIT SHARMA