आजपासून हे ॲप्स बंद


11/05/2022 16:52:23 PM   Sweta Mitra         2


कॉल रेकॉर्ड करण्यासाठी जर तुम्ही थर्ड-पार्टी ॲप वापरत असाल तर आजपासून तुम्ही तसे करू शकणार नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे Google च्या नवीन धोरणानुसार Android स्मार्टफोन्सवरील थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घालण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, 11 मे पासून ॲप डेव्हलपर थर्ड पार्टी ॲप्सद्वारे कॉल रेकॉर्डिंग फीचर देऊ शकणार नाहीत. कंपनीने अलीकडेच आपल्या Play Store धोरणात काही बदल केले आहेत आणि त्यानुसार Android वर कॉल रेकॉर्डिंग ॲप्स बंद करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. नवीन धोरणानुसार, ॲप्सना यापुढे Play Store वर कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी असणार नाही.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              app call recording stop google google play store