12/05/2022 16:53:50 PM Sweta Mitra 10
अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आणि स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज केल्या आहेत. खासदारकीची मुदत संपल्यानंतर आज गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहे. ते म्हणाले. आज मी दोन निर्णय घेतले आहेत. त्यातील पहिला निर्णय राज्यसभेसंबधीत आहेत. जुलैमध्ये राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. मी राज्यसभेची निवडून निश्चित लढवणार आहे. दुसरी मोठी घोषणा करताना संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला एका छताखाली कसं आणाचं यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यासाठी 'स्वराज्य संघटना' नावाने ही संघटना आम्ही स्थापन केली आहे अशी दुसरी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.