12/05/2022 16:58:35 PM Sweta Mitra 2
इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हाॅट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर जारी करत आहे. व्हाॅट्सअॅपने नुकतेच नवे फीचर्स जारी केले असून त्यामुळे व्हाॅट्सअॅप वापरकर्त्यांच्या काही मर्यादा दूर झाले आहे. टेलिग्राम मेसेजेस एवढेच नव्हे तर इंस्टाग्रामवर उपलब्ध असलेल्या रिएक्शन इमोजीस आता व्हाॅट्सअॅप वर देखील उपलब्ध झाले आहे. तसेच व्हाॅट्सअॅपवर आतापर्यंत १०० एमबी पर्यंत शेअर करता येत होता. मात्र आता डेटा ट्रान्सफरची मर्यादा तब्बल २ जीबी पर्यंत वाढवली आहे. व्हाॅट्सअॅप वरून आता तब्बल 32 जण एकत्रितपणे व्हॉइस कॉल करू शकणार आहेत. त्यासह नव्या फीचर्स नुसार व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये आता 512 जणाना ॲड करता येणार आहे. आतापर्यंत ग्रुप मेंबर्सची मर्यादा 256 जणांची होती.