एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर


12/05/2022 17:00:18 PM   Sweta Mitra         11


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवेच्या गट अ आणि गट ब यासह विविध परीक्षांसाठी जाहीरात काढली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ ची तारीख जाहीर झाली असून या अंतर्गत १६१ पदांची भरती करण्यात येणार आहे. एमपीएससी आयोगाने याची माहिती दिली आहे. विविध विभागातील विविध संवर्गातील पदे यामध्ये भरली जाणार आहेत. महाराष्ट्रातील ३७ केंद्रावर ही परीक्षा होणार असून २१ ऑगस्ट २०२२ रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा २१ ते २३ जानेवारी २०२३ किंवा त्यानंतर आयोजित होऊ शकते अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. याची जाहिरात  https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर सविस्तर देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १२ मे २०२२ पासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत १ जून २०२२ पर्यंत आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              mpsc result commission maharashtra india post exam