मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचा वाढदिवस


13/05/2022 16:27:33 PM   Sweta Mitra         13










मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृता सुभाषने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलेय. याती फुलराणी या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. किल्ला, श्वास यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकांचे आजवर कौतुक झाले आहे. तसेच सेक्रेड गेम मधल्या तिच्या भूमिकेला तर खूपच वाहवाह मिळाली. पुढे ती मैं अल्बर्ट अनस्टान बनना चाहता हूँ या तिच्या आगामी चित्रपटात एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारणार आहे.






also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              actress entertainment marathi actress amrita subhash birthday birthday celebration