५ मजुरांचा जागीच मृत्यू


13/05/2022 16:30:43 PM   Sweta Mitra         2


जळगावात एक भीषण अपघात  झाला आहे. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध टाकत होते. अचानक भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ ४ ते ५ वाहनांनी टँकरला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात  ५ जण जागीच ठार झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून २ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर रात्री धुळ्याहून दूध घेऊन निघालेला टँकर अचानक बंद पडला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. यामध्ये बंद पडलेल्या टँकरमधील ३ जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              accident massive accident dead wokrer maharashtra jalgaon