उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा


14/05/2022 14:00:13 PM   Sweta Mitra         1


मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बेकेसीमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यामुळं या सभेत उद्धव ठाकरे विरोधकांनी काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळं आजची सभा वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत वर्तवण्यात येत आहेत. संजय राऊतांनी आज सकाळीच एक शायरी ट्वीट केली आहे. 'लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कुछ लोग भूल गये है अंदाज हमारा!', अशी शायरी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच, शायरीच्या शेवटी जय महाराष्ट्र असंही म्हटलं आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Chief Minister Shiv Sena chief Uddhav Thackeray Bekesi MumbaiThackeray government Sanjay Raut