14/05/2022 14:39:11 PM Sweta Mitra 12
दिल्लीतील मुंडका येथील एका तीन मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती अग्निशमन दलाला दुपारी ४.४० च्या सुमारास मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर दिल्ली पोलिसांनी १४ मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे. या भीषण आगीबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत तीन मजली आहे आणि सामान्यतः कंपन्यांना कार्यालयाची जागा देण्यासाठी वापरण्यात येणारी व्यावसायिक इमारत आहे.ही आग कशामुळे लागली, कारण काय, याचा खुलासा अद्याप झालेला नाही