दोघांना विष पाजून आईची आत्महत्या


14/05/2022 14:42:09 PM   Sweta Mitra         2जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांना विष पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या पेनूर येथे ही धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. प्रियांका चवरे असे महिलेचे नाव असून सात महिन्याच्या सुप्रियाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून प्रियांका चवरे नावाच्या महिलेने आपल्या सात वर्षाच्या मुलीसह चार वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजले. यानंतर प्रियंका चवरे या महिलने स्वतः टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेत सात महिन्यांच्या सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षांच्या मुलावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              children Penur Mohol taluka Solapur Priyanka Chavre poison Priyanka Chavre