14/05/2022 14:47:02 PM Sweta Mitra 2
सचिन खेडेकर खेडेकर हे मराठी मनोरंजसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठीसोबतच हिंदी, तमिळ आणि तेलुगु या चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. आज सचिन यांचा वाढदिवस आहे. 56 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 1990 पासून आजतागायत त्यांनी अनेक सुपरहिट नाटकं आणि चित्रपटांध्ये काम केलं आहे. कधी रोमँटिक हिरो, कधी वडील, कधी भाऊ तर कधी चित्रपटातील क्रूर खलनायक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं आहे.