कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!


14/05/2022 14:53:08 PM   Sweta Mitra         2


सध्या नवीन कांदा बाजारात आलेला आहे. कांद्याची आंवक वाढल्याने दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला प्रतिकिलो अवघा 1 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. कांद्याला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तालुक्यात सिंचनाची व्यवस्था वाढल्याने अनेक शेतकरी कांदा व इतर भाजीपालावर्गीय पीके घेत आहेत. लाल कांद्याचे उत्पादन यंदा चांगलेच वाढले आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. एकीकडे कांदा उत्पादन वाढलेले असताना दुसरीकडे सध्याच्या बाजारभावातून शेतकऱ्यांचा उत्पादन फिटणेदेखील खर्च दुरापास्त झाले असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              onionprice maharstra mumbai india onion pricehike vegetables cooking