14/05/2022 14:56:41 PM Sweta Mitra 2
वाढत्या महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून मुलभूत गरजा भागवण्यासाठी चोरट्यांनी दुकानांमध्ये डल्ला मारल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत . अशीच एक चोरीची घटना कल्याण पश्चिमेकडील केशाज लेडीज गारमेंट दुकानात घडली. महिला चोरांनी दुकानात घुसून महागडे कपडे चोरुन पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांची टोळी दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली असून बाजारपेठ पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केलाय. चोरीच्या घटनेची तक्रारीची नोंद बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलीय. चोरट्यांमध्ये ५ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. कल्याणच्या केशाज या कपड्यांच्या दुकानातू तब्बल ३२ हजाराचे कपडे चोरून चोरट्यांनी पलायन केले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.