अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे. केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.