14/05/2022 15:03:13 PM Sweta Mitra 2
पावसाची चाहूल देणाऱ्या नवरंग पक्षाचं कोकणामध्ये आगमन झाल आहे. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखीलयंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.