क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे निधन


15/05/2022 17:01:34 PM   Sweta Mitra         23


ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंडस्चे कार अपघतात निधन झाले आहे. सायमंडसच्या कारला शनिवारी रात्री अपघात झाला होता. टाऊन्सविलेपासून ५० किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. वयाच्या ४६ व्या वर्षी सायमंडसने अखेरचा श्वास घेतला. मार्चपासून ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन झाल्याने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर जखमी अवस्थेत सायमंड्सला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तो गंभीर जखमी झाला होता, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              cricket cricket world cricketar andrew samson dead massive accident