29/05/2022 16:36:04 PM Sweta Mitra 21
जवळपास दोन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम क्षणी पोहचला आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (29 मे 2022) आयपीएल 2022 मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. यंदाच्या हंगामात गुजरातच्या संघानं दमदारी कामगिरी करून आधी सर्वात प्रथम प्लेऑफचं स्थान गाठलं. त्यानंतर क्वालिफायर 1 मध्ये राजस्थानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. गुजरातकडून पराभूत झाल्यानंतर राजस्थानच्या संघानं क्वालिफायर 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामुळं आजचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.