07/06/2022 17:18:13 PM Sweta Mitra 9
नाशिकमध्ये घराच्या अंगणात बसलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. नाशिकच्या मुंगसरे गावात बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसतो. पाळीव कुत्र्यावर बिबट्याने केलेला हल्ला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना नाशिकच्या मुंगसरे गावातील आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या अंगणात पाळीव कुत्रा बसला होता. तेवढ्यात बिबट्या आला. यावेळी किशोर उगले यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला चावा घेतला. मात्र, बिबट्याने कुत्र्याला पकडले. बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतल्यानंतर कुत्र्यानेही या बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र, या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेला. गावात शिरुन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.