08/06/2022 17:29:30 PM Sweta Mitra 20
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज 47 वा वाढदिवस. बॉलिवूमध्ये अनेक हिट सिनेमा दिलेली शिल्पा सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरीही तिच्या फिटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. बाॅलिवूडमध्ये फिटनेससाठी शिल्पा शेट्टी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेस आणि योगाचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. त्यामुळे तिच्या फिटनेसबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. स्वत:ला छान ठेवण्यासाठी शिल्पा रोज व्यायाम करते. त्यात कार्डिओ, स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि योगही आहे. पाच दिवस ती जिममध्ये जाते आणि दोन दिवस योगाला देते. तणावापासून दूर राहण्यासाठी शिल्पा रोज 10 मिनिटं मेडिटेशन करते. दिवसाची सुरुवात ती आवळा आणि ओलिवरा ज्युसचं करते. जेवणात ऑलिव्ह ऑइल वापरते. शिवाय जास्त करून ती शाकाहारी अन्न घेते.