विराटचे 'सोशल' द्विशतक


08/06/2022 17:38:02 PM   Sweta Mitra         18


भारतीय टीमचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक कारनामे केलेत. फलंदाजीमध्ये असे फार कमी विक्रम आहेत जे विराटच्या नावावर नाहीत. मैदानावर जितका विराटचा दबदबा आहे तितकाच सोशल मीडियावरही आहे. नुकतच विराटने इंस्टाग्रामवर एक नवा विक्रम केला आहे.
इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराट कोहलीच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. कोहलीने या बाबतीत नवा विक्रम केला आहे. 200 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
जगभरातील सर्व क्रीडा दिग्गजांच्या फॉलोअर्सची यादी पाहिली तर कोहली यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर जगभरात सर्वाधिक फॉलो केलं जाणारा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. रोनाल्डोचे 451 मिलियन (45.1 कोटी) आणि मेस्सीचे 334 मिलियन (33.4 दशलक्ष) चाहते आहेत.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              virat kohli cricketar indian cricketar social media instagram