09/06/2022 17:12:48 PM Sweta Mitra 22
'प्यार हुआ, इकरार हुआ...' पण, लग्ना काही होऊच शकलं नाही. असंच काहीसं घडलं एका अतिशय जोडीसोबत. या जोडीनं अगदी चाहत्यांसमोरच एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली असं म्हणायला हरकत नाही. त्यांची मैत्री झाली, पुढं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर ही मैत्री, प्रेम याहीपलीकडे जात ही जोडी सहजीवनाची स्वप्न पाहू लागली. कौटुंबीक कार्यक्रमांपासून ते अगदी एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करताना ही सेलिब्रिटी जोडी दिसली. पण, आता तर त्यांच्या लग्नाच्या चर्चाही जोर धरु लागल्या. किंबहुना तयारीही सुरु होणार इतक्यातच यामध्ये मीठाचा खडा पडला. चाहत्यांना लग्नाच्या तारखेची प्रतीक्षा असताना थेट त्यांना ब्रेकअपचीच बातमी देणारी ही जोडी आहे, अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांची. शमिताशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांनीही प्रेमाच्या नात्यातून आपआपल्या वेगळ्या वाटा निवडल्या आहेत. दोघांच्या मनातही एकमेकांविषयी प्रचंड आदर आहे. त्यांची मैत्रीही कायम आहे. पण, यापुढं हे प्रेमाचं नातं मात्र पाहता येणार नाही. काही दिवसांपूर्वीसुद्धा राकेश आणि शमिताच्या ब्रेकअपच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. पण, त्यानंतर मात्र या जोडीनं या सर्व चर्चा उधळून लावल्या होत्या. आता मात्र त्यांच्या नात्याला तडा गेल्याचं स्पष्टच सांगण्यात येत आहे.