सिद्धू मूसे वाला यांच्या आठवणी


11/06/2022 17:52:57 PM   Sweta Mitra         6


पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला याची हत्या सर्वांना मोठा धक्का देणारी होती. त्याचे अनेक चाहते अद्याप या धक्क्यातून सावरले नाही आहे. केवळ पंजाब किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मूसेवालाचे फॅन्स होते. त्याची फॅन फॉलोइंग तगडी होती. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नायजेरियातील ग्नॅमी अवॉर्ड विजेता गायक आणि रॅपर बर्ना बॉय लाइव्ह शोमध्ये हुंदके देताना दिसतो आहे. सिद्धू मूसेवाला याला श्रद्धांजली वाहताना तो भावुक झाला आहे.या व्हिडिओमध्ये बर्ना बॉय सिद्धू मूसेवालाचं ( नाव घेतो. RIP सिद्धू मूसेवाला असं तो म्हणतो आणि त्याला श्रद्धांजली वाहताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो कसंबसं स्वत:ला सावरत सिद्धूची ती स्टेप करतो ज्यावर संपूर्ण जग फिदा होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओही  व्हायरल होत आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              sidhu moosewala singer punjabi singer dead birthday birth anniversary