15/06/2022 17:43:05 PM Sweta Mitra 3
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केलाय. पण स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर देखील नीरजला सुवर्णपदक जिंकता आले नाही. भारताच्या या स्टार भालाफेकपटूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. फिनलँडमधील पावो नुरमी गेम्समध्ये नीरजने ८९.०३ मीटर लांब थ्रो केला. याआधी त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये पावो नुरमी एक मोठी स्पर्धा मानली जाते. डायमंड लीगनंतरची ही सर्वात मोठी ट्रॅक फील्ड स्पर्धा आहे. या स्पर्धेत भाग घेणारा नीरज हा एकमेव भारतीय खेळाडू होता.