आलिया रणवीरच्या ब्रह्मास्त्रचा ट्रेलर


15/06/2022 17:45:32 PM   Sweta Mitra         3


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांसाठी आजचा दिवस मोठा आहे. कारण आज अखेर रणबीर आणि आलिया स्टारर 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. इतकंच नव्हे तर रणबीर कपूर आणि आलिया भट्टदेखील यासाठी खूप उत्सुक होते. कारण या दोघांचा हा एकत्र पहिलाच चित्रपट आहे.
नुकतंच या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज ऐकायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये हा चित्रपट शिवा अर्थातच रणबीर कपूरभोवती फिरतणार असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहून सर्वच थक्क झाले आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटाची उत्सुकता नक्कीच वाढणार यात शंका नाही. या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय रंजक आहे.'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरला युट्युबवर अवघ्या दोन तासांत तब्बल 11 लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. तर आलिया भट्टच्या इन्स्टाग्रामवर 16 लाखाच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              alia bhatt ranbir kapoor brahmastra movie trailor mouni roy amitabh bacchan nagarjuna