16/06/2022 17:49:09 PM Sweta Mitra 3
आयर्लंडच्या दौऱ्यासाठी आता भारताचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघाला यावेळी एक नवा कर्णधार मिळाल्याचे या संघावर नजर फिरवल्यावर पाहायला मिळत आहे. भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना हा २६ जून आणि दुसरा सामना हा २८ जूनला खेळवण्यात येणार आहे.भारताला या दौऱ्यासाठी नवीन कर्णधार मिळाला आहे. कारण या दौऱ्यासाठी भारताचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्वाचे खेळाडू यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यात व्यस्त असतील. त्यामुळे हा नवीन संघ बीसीसीआयने निवडला आहे. या संघाचे उपकर्णधारपद यावेळी भुवनेश्वर कुमारला देण्यात आले आहे.