काजल अगरवालचा वाढदिवस


19/06/2022 18:42:30 PM   Sweta Mitra         3


साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री आज (19 जून) आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली. साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री काजल अग्रवालने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि बॉलिवूडविश्वही गाजवले. काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे. काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती. काजल अग्रवालने 2004 मध्ये ‘क्यूं हो गया ना’ या बॉलिवूड चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              actress bollywood actress kollywood kajal agarwal birthday birthday celebration