अभिनंदन नीरज चोप्रा


19/06/2022 18:47:06 PM   Sweta Mitra         14


भारताला टोकिओ ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं आणखी एकदा सुवर्णमय कामगिरी केली आहे. फिनलँडमध्ये सुरु आसलेल्या कुओर्ताने गेम्समध्ये नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकलं आहे. नीरज चोप्रानं या स्पर्धेत ८६.८९ मीटर अंतरावर भाला फेकला. दुसरे स्पर्धक नीरज चोप्राची बरोबरी देखील करु शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रानं नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. नीरज चोप्रानं फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेतील पहिल्या फेरीतचं ८६.८९ मीटर अंतरावर भाला फेकला. नीरज चोप्रासोबत स्पर्धेत असलेल्या इतर खेळाडूंना त्या अंतराला पार करता आलं नाही. नंतरच्या वेळी नीरज चोप्रानं पुढील दोन प्रयत्न फाऊल केले. कारण, दुसऱ्यांदा फेकलेला भाला कमी अंतरावर पडल्यास नुकसान होण्याची शक्यता होती. दरम्यान नीरज चोप्रा जखमी देखील झाला होता. भालाफेक करताना नीरजचा पाय घसरला होता. मात्र, त्यानं हार मानली नाही. नीरज चोप्रानं सुवर्णपदक मिळवल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील अभिनंदन केलं आहे. नीरज चोप्राचा व्हिडिओ ट्वट करत नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळालं असल्याचं ते म्हणाले.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              neeraj chopra javlin javlin throw gold finlad