उलट्या दिशेने वाहू लागली नदी!


20/06/2022 16:51:07 PM   Sweta Mitra         16


मोसमी पावसाने अजूनही हुलकावणी दिली असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक सरीवर सरी कोसळत आहेत. या अचानक सरी कोसळून कोरड्या पडलेल्या हिरण्यकेशी नदीचे पात्र उलट्या दिशेने वाहू लागले. पावसाने काही मिनिटांमध्ये रौद्ररुप धारण केल्यानंतर हिरण्यकेशी नदीचे पात्र पश्चिमेच्या दिशेने उलटे वाहू लागले. कोरड्य पडलेल्या नदी पात्राचा उलट दिशेचा प्रवास पाहून ग्रामस्थांनाही सुखद धक्का बसला. सीमाभागात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांमध्येच धुमशान सुरु केल्यानंतर नांगनूर, संकेश्वर, अरळगंडी, हेब्बाळ, गोटूर, कमतनूर आदी भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाची तीव्रता इतकी भयानक होती, की महामार्गावरील गडहिंग्लज पुलाखालून पाणी वाहू लागले. ओढ्यांमधील पाण्याचा लोटही नदीत येऊन मिळाले. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा थेंबही नसल्याने, पण पूर्वेकडे झालेल्या मुसळधार पावसाने नदीचे पात्र अचानक वाहू लागले. त्यामुळे पूर्ववाहिनी हिरण्यकेशी नदी पश्चिमेकडे उलट दिशेने वाहू लागली. 
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Kolhapur Hiranyakeshi Nangnur Sankeshwar Aralgandi Hebbal Gotur Kamatnur rain Gadhinglaj bridge highwayHiranyakeshi